फेशिअल योगा का ,आणि कसा करावा

शुक्रवार, 4 जून 2021 (22:02 IST)
आपण खूप व्यस्त असल्यास आणि स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ काढण्यास सक्षम नसल्यास आपल्या वेळापत्रकातून फक्त 10 मिनिटे काढा आणि चेहऱ्यासाठी हे फेशिअल योगा करा.हे  योगा चेहऱ्याचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी महत्वपूर्ण आहे.हा योगा चेहऱ्याला आकर्षक आणि सुंदर बनवतो.
 
फेशिअल योगा करण्यासाठी खास टिप्स-
फेशिअल योगा कसा करावा.
 
1 सर्वप्रथम मान ताठ ठेवा आणि भुवयांना वर-खाली करा.
 
2 भुवया संकुचित करा,कपाळावर उभ्या आणि आडव्या सुरकुत्या पाडा.
 
3 मान ताठ ठेवा आणि वर खाली बघा.
 
4 डोळे दोन्ही दिशेत गोलाकार फिरवा. 
 
5 डोळ्यांवर तळहात चोळून काही वेळ ठेवा.
 
6 सकाळी आणि रात्री थंड पाण्याने आपले डोळे धुवा.
 
7 नासाग्रे फुगवा,आणि सैल सोडा.
 
8 तोंड पूर्ण उघडा आणि बंद करा.
 
9 जबड्याला उजवीकडे डावीकडे हलवा.
 
10 ओठांना संकुचित करा आणि पसरवा. 
 
11 दाताला दाखवा आणि बंद करा.
 
12 तोंडाने फुगा फुगवा.
 
13 दातावर दात ठेवून जोराने दाबा.
 
14 मानेच्या चमडीला ओढा,जबडा घट्ट करा.
 
15 दहा पर्यंत मोजत मान मागे न्या.
 
16 तोंडात पाणी घेऊन हलवा.
 
17 झोपण्याच्या पूर्वी दररोज चेहरा स्वच्छ करा.जर आपण कामकाजी महिला आहात तर चेहरा डीप क्लिंझिंग ने स्वच्छ करा.
 
व्यायामा शिवाय, संतुलित आहार घेणे आपल्या त्वचेत  वास्तविक चमक आणते.. म्हणून, पुरेसे पाणी प्या, दूध, दही, सॅलड , फळे, हिरव्या भाज्या भरपूर खा. हे खाणे आवश्यक आहे. सूर्याच्या तीक्ष्ण किरणांपासून त्वचेचा बचाव करा आणि सनग्लासेस घाला.
 
यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या त्वचेच्या तंदुरुस्तीसाठी  एक नवीन पाऊल उचला. या योग टिप्स अवलंबवून बघा. हा फेशिअल योग 5-7 मिनिटांसाठी दररोज 8-10 ते 20 वेळा करा. आपण 15 दिवसात फरक बघाल.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती