आता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अधिक त्रास होत असेल तर, अशा वेळी दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा: पाठीच्या मणक्याचा त्रास हा वृद्धापकाळात प्रत्येकालाच होतोच. हलासन केल्याने वृद्धापकाळात याचा फायदा होतो. तसेच याच्या नियमित अभ्यासाने अजीर्ण, गॅसेस, थायराईड, दमा, कफ, रक्तविकार आदी त्रास कमी होतात.
शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाड्या. तीन नाड्या आपल्या शरीरात असतात. आपण डॉक्टरकडे अथवा कोणत्याही वैद्याकडे गेलो तर, सर्वांत आधी ते आपला हात हातात घेऊन या नाड्या तपासतात. या नाड्यांवरून आपल्याला होणार्या त्रासाचे निदान डॉक्टर करत असतात.