या योगासनाचा सराव केल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होईल
शनिवार, 4 जून 2022 (20:20 IST)
आपल्या मुलांची उंची वाढण्यासाठी बरेच पालक अनेक प्रयोग करत असतात.काही पालक आपल्या मुलांना दोरीउड्या करणे, उंच लटकणे ,धावणे आणि उड्या मारायला लावतात. जेणे करून त्यांची उंची वाढेल. पण असं करून उंची वाढेल असे नाही. उंची नसल्यामुळे मुलांच्या मनात हीन-भावना येते. पण योगाभ्यास करून उंची वाढवण्यास मदत मिळते. ही काही योगासने आहेत ज्यांचा सराव करून मुलांची उंची वाढविण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ या.
उंची वाढवण्यासाठी योगासने
1. ताडासन
लहान मुलांमध्ये किंवा पौगंडावस्थेमध्ये मुलांनी ताडासनाचा सराव केला तर त्यांची उंची वाढण्यास मदत होते. डोक्यापासून पायापर्यंत शरीर ताणल्यामुळे या आसनाचा आपल्याला नसा आणि शरीराशी संबंधित विविध आजारांमध्येही फायदा होतो.
प्रथमच ताडासन केल्यावर, तुम्हाला हे आसन अवघड वाटू शकते. याशिवाय समतोल साधणेही कठीण आहे. पण तुमच्या पायांमधील अंतर 5-6 इंच ठेवल्यास ताडासनाच्या सरावात संतुलन राखणे तुम्हाला सोपे जाईल.
2. भुजंगासन
भुजंगासनामुळे आपली पाठ मजबूत आणि पाठीचा कणा लवचिक होतो. हे आपल्या पाचन आणि पुनरुत्पादक प्रणाली मजबूत करते. या आसनाच्या नियमित सरावाने शरीर सुडौल बनते आणि योग्य उंची वाढण्यास मदत होते.
3. पश्चिमोत्तनासन
पश्चिमोत्तनासन पाठीच्या कण्यामध्ये ताण निर्माण करते आणि त्यांना लवचिक बनविण्याचे कार्य करते. याशिवाय या आसनाचा सराव केल्याने व्यक्तीची उंचीही सहज वाढू लागते. पश्चिमोत्तनासनाचा योग्य पद्धतीने सराव करताना पोटाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे पोटात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात साठलेली चरबी निघून जाते. यामुळे उंचीचा योग्य विकास होण्यासही मदत होते.
4. वृक्षासन
वृक्षासनादरम्यान, तुम्ही स्ट्रेचिंगद्वारे तुमचे मन आणि शरीर स्थिर होते. हे आसन तुमचे सांधे आणि हाडे मजबूत करते. उंचीच्या वाढीदरम्यान शरीराच्या हाडांच्या संरचनेत झपाट्याने बदल होतात, ते बरे होण्यासही हे आसन मदत करते.
याशिवाय, नितंब आणि छातीचा भाग ताणण्यास देखील मदत करते. हे तुमच्या खांद्यांची हालचाल मोकळी करते आणि हातांना टोन करण्यास मदत करते.
5. त्रिकोणासन
त्रिकोणासनाच्या सततच्या सरावाने घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतात. यामुळे घोट्यावर, मांडीचा सांधा, मांड्या, खांदे, गुडघे, कूल्हे, वासरे, हॅमस्ट्रिंग्स, वक्षस्थळ आणि बरगड्यांवर ताण येतो.
इतर अनेक आसनांप्रमाणे हे आसन देखील अनेक गोष्टींचे मिश्रण आहे. हे तुमच्या पायांमध्ये ताकद आणि स्थिरता विकसित करते आणि धड ताणते.जेव्हा तुमच्या हातपायांमध्ये जास्त स्ट्रेचिंग होते तेव्हा त्यामुळे शरीराचाही तितकाच विकास होतो.