पद्मासन

एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्‍या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.

कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते.

पद्मासनाचे फायदे : 'इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक,
 
WD
दैविक आणि भौतिक व्याधी.

पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.

घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती