मल+आसन म्हणजे मल किंवा विष्टा काढताना ज्या अवस्थेत बसतो त्याला मलासन असे म्हणतात.या आसनाची एक आणखी पद्धत आहे, परंतु इथे सामान्य पद्धतीची ओळख आहे. शौचालयात जाण्यापासून दिवसभर काम करण्यासाठी आपण खुर्चीवर बसतोच.ज्यामुळे आपली कंबर आणि कंबरेच्या खालील भागाच्या स्नायूंचा व्यायाम अजिबात होत नाही. आपली दिनचर्या अशीच असेल तर सकाळी उठल्यावर किमान दहा मिनिटे मलासन मध्ये बसल्यावर फायदा होईल.