निरोगी राहण्यासाठी योग करणे खूप चांगले आहे. दररोजच्या धकाधकी च्या जीवनात योग करायचा आहे पण सकाळी वेळे अभावी योग क्लासेस मध्ये सामील होऊ शकत नाही? निरोगी रहायचे आहे परंतु व्यायामासाठी वेळ नाही? जर आपल्याला ही वेळे अभावामुळे हे शक्य नाही तर 10 मिनिटाचा वेळ काढून आपण ही काही आसने घरी बसल्या करू शकता. हे आसन करायला खूप सोपे आहे. हे केल्याने आपण दिवसभर उर्जावान राहाल. चला तर मग कोणती आसने आहे , आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊ या.
3 ताडासन
पाठ सरळ करून बसा. यानंतर बोटे एकमेकांत अडकवून बसा. आतून श्वास घ्या आणि तळहाता समोर ठेवून हात पसरवा. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर हात वर घेऊ शकता. हात वर करताना, दीर्घ श्वास आत घ्या. खाली येताना श्वास सोडा.