या 5 योगासनांमुळे कंबरेवर जमा झालेली चरबी दूर होते

बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (23:05 IST)
पोट आणि कंबरेभोवती जमा झालेली चरबी केवळ व्यक्तिमत्व खराब करून आत्मविश्वासाचं कमी करत नाही. तर आरोग्यासाठी अनेक धोके देखील निर्माण करू शकतात. कंबरेवर जमा झालेली ही चरबी कमी करण्यासाठी  व्यक्तीला कठोर परिश्रम करावे लागतात. पोटावर साचलेली चरबी ही वाईट जीवनशैली, दिवसभर काम करणे, कसरत न करणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यांचा परिणाम आहे. ज्यामुळे पुढे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज हे सोपे योगासन करा.  
 
हे योगासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 भुजंगासन (कोब्रा पोझ)- भुजंगासन हे फणा असलेल्या सापासारखे दिसते, म्हणून या आसनाचे नाव भुजंगासन आहे. हे आसन प्रामुख्याने  ओटीपोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पाठीच्या खालच्या बाजूला आराम करण्यासाठी काम करते. हे आपल्या मणक्याला लवचिक बनवून आपली पाचन आणि प्रजनन प्रणाली मजबूत करते. याशिवाय हे आसन आपली चक्रे उघडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.
 
2 नौकासन (बोट पोझ)- या आसनाला इंग्रजीत बोट पोझ असेही म्हणतात. या आसनात ती बोटीसारखी धरलेली असते म्हणून याला नौकासन म्हणतात. ही अशी पोझ आहे जी  बाजूच्या आणि पोटाच्या स्नायूंवर काम करते आणि तुमचा गाभा मजबूत करते. दररोज नौकासनाचा सराव केल्याने  पोटाची आणि बाजूची चरबी कमी होते. नौकासनामध्ये, आपले पोटाचे आणि बाजूचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे वजन कमी करण्यातही फायदा होतो. 
 
3 उष्ट्रासन (उंटाची पोज)- उष्ट्रासन हे थोडे अवघड आसन आहे. जरआपल्याला पाठीशी संबंधित कोणतीही समस्या नसेल तरच हे योगासन करा. उष्ट्रासनाच्या सरावाने छाती आणि पोटाच्या खालच्या भागावरील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे कंबर आणि खांदे मजबूत होतात. हे पाठीच्या खालच्या भागात वेदना कमी करण्यास मदत करते.
 
4 धनुरासन (बो पोज)-धनुरासनामुळे पाठीबरोबरच पोटाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.हे आसन एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. यामुळे तुमच्या पाठीची लवचिकता वाढते तसेच कंबर दुखी कमी होण्यास मदत होते.
 
5 चक्की चलनासन- पोटाची चरबी कमी करण्यासाठी,चक्की चलनासन हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे . हे आसन केल्याने पाठीच्या, पोटाच्या आणि हातांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि छाती आणि ओटीपोटाच्या भागात ताण येतो. हे आपल्या मणक्याला लवचिक  ठेवण्यास देखील मदत करते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती