टाचांना वेदना होत असल्यास हे व्यायाम करा

शनिवार, 29 मे 2021 (17:09 IST)
टाचा दुखणे खूप वेदनादायी आहे.औषधोपचार केल्यावर ती निघून जाते.परंतु हे तात्पुरतीच असतं.मुळापासून हे नाहीसे करायचे असल्यास योगासन करणे फायदेशीर आहे. टाचांच्या वेदनांमध्ये कोणती आसने आराम देतात हे जाणून घ्या. 
 
* उष्ट्रासन - हे आसन करताना शरीराची मुद्रा एखाद्या उंटाप्रमाणे दिसते.म्हणून हे उष्ट्रासन म्हणवले जाते.हे करण्यासाठी गुडघ्यावर बसावे,आता गुघड्यावर उभे राहावे शरीराला मागे नेत दोन्ही हाताने टाचांना स्पर्श करा.पोट पुढे ओढत दीर्घ श्वास घेण्याचा सराव सुरु ठेवा.
 
* गौमुखासन- हे करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर बसावे.उजवा पाय गुडघ्यापासून वाकवून डावीकडे न्यावे आणि त्याच प्रमाणे या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.डावाहात उचलत कोपऱ्याने दुमडून मागे घ्या आणि 
उजवा हात कंबरेपासून मागे नेत डावा हात धरण्याचा प्रयत्न करा.20 ते 30 सेकंद याच अवस्थेत राहा.
 
* बालासन - हे करण्यासाठी गुडघ्यावर बसा.हात वर नेत जमिनीवर वाका.डोकं जमिनीवर टेकून द्या आणि तळहात देखील जमिनीकडे वळवा.या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या.असं केल्याने टाचांच्या वेदनेपासून आराम मिळेल. दररोज या आसनाचा सराव करा.   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती