उन्हाळयात हे 3 योगासन करा ,शरीरातील उष्णता शांत करण्यास उपयुक्त आहे

शुक्रवार, 7 जून 2024 (07:05 IST)
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे, लोक सहसा व्यायाम आणि योगाभ्यास करणे टाळतात, कारण कडक उन्हात घाम येणे कोणालाही आवडत नाही. प्रत्यक्षात योगासन केल्यास उष्णतेपासून आराम मिळण्यास मदत होते. योगाच्या माध्यमातून मन आणि शरीर दोन्ही शांत राहतात. ज्यामुळे मानसिक शांती मिळते आणि ही मानसिक शांती तुमच्या शरीरालाही शीतलता प्रदान करते.
 
उष्णतेपासून आराम मिळवून देण्यासाठी हे 3 योगासन उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
 
वृक्षासन (झाडाची मुद्रा)
वृक्षासनाला 'ट्री पोज' असेही म्हणतात, कारण या आसनाच्या अभ्यासादरम्यान व्यक्तीची शरीर मुद्रा झाडासारखी दिसते. त्याच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, हे योग आसन तणाव आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते . याच्या सरावाने हात आणि पायांच्या स्नायूंचा ताण कमी होतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. अशा स्थितीत मन आणि शरीराला आराम देताना उष्णतेमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी हे योग आसन उपयुक्त ठरते.
 
कसे कराल- 
यासाठी योगा चटईवर सरळ उभे राहून उजव्या पायाचा गुडघा वाकवून त्याचा तळ डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. लक्षात ठेवा उजव्या पायाचा तळवा गुडघ्यावर नसून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. यानंतर, तुमचे संपूर्ण शरीराचे वजन तुमच्या डाव्या पायावर ठेवा आणि संतुलन राखून सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर, दीर्घ श्वास घेताना, आपल्या दोन्ही हातांनी डोके वरती नमस्कारची मुद्रा  करा. काही वेळ या आसनात राहा.
 
शीतली प्राणायाम
उष्णतेमुळे शरीरात पित्त वाढते, त्यामुळे घाम येणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत पित्ताचा समतोल साधून शितली प्राणायामचा सराव उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतो. वास्तविक शीतली प्राणायाम हे एक प्रकारचे श्वासोच्छवासाचे तंत्र आहे ज्याद्वारे थंड हवा घेऊन शरीर थंड करण्याचा प्रयत्न केला जातो.
 
कसे कराल 
यासाठी मोकळ्या आणि स्वच्छ ठिकाणी ध्यानस्थ बसा. यानंतर, जीभ बाहेर काढा आणि त्यातून श्वास घ्या. काही वेळ श्वास रोखून ठेवा आणि नंतर श्वास सोडा. ही प्रक्रिया किमान 5 ते 10 वेळा पुन्हा करा आणि नंतर सामान्य स्थितीत या.
 
 
शवासन
शवासनाचा सराव मन आणि शरीराला थंडावा देऊन उष्णतेपासून आराम मिळवून देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. वास्तविक, हे योग आसन मन, मेंदू आणि शरीरावर कोणताही अतिरिक्त दबाव न आणता शांत करते. 
याच्या नियमित सरावाने श्वसनमार्ग उघडतो, स्नायूंचा ताण कमी होतो आणि उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो. यासोबतच हे योगासन मधुमेह , मानसिक आजार आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे 
 
कसे कराल- 
यासाठी शांत ठिकाणी योगा मॅट पसरवा आणि पाठीवर झोपा. यानंतर, आपले हात आणि पाय डोके आणि धडापासून काही अंतरावर ठेवा आणि त्यांना आरामशीर स्थितीत आणा. लक्षात ठेवा की या स्थितीत तुमचे तळवे आकाशाकडे असले पाहिजेत. आता स्वतःला शांत करत दीर्घ श्वास घ्या. काही वेळ अशा स्थितीत राहा नंतर सामान्य अवस्थेत या.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती