Bhujangasana yoga : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच खानपानच्या सवयीमुळे लोक आजाराला बळी पडत आहे. निरोगी ठेवण्यासाठी योगासन करणे फायदेशीर ठरू शकते. योगा केल्याने मन आणि मेंदू शांत राहते. सध्या मानसिक तणावामुळे फारच कमी वयात रक्तदाब, मधुमेहासारखे आजार होतात.पण योगा केल्याने आजार कमी करता येतात. भुजंगासनाचा नियमित सराव केल्याने अनेक गंभीर आजार कमी करू शकतो. तणाव किंवा नैराश्यावर भुजंगासन रामबाण आहे. याला कोब्रा पोझ देखील म्हणतात. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊ या.
नैराश्य आणि तणावापासून मुक्ती मिळते
हे भुंजगासन नियमितपणे केल्यास नैराश्य आणि तणावातून आराम मिळू शकतो. हे योग आसन नैराश्याची लक्षणे कमी करण्यास आणि वात दोष कमी करण्यास देखील मदत करू शकते.
थॉयराइड-
भुजंगासन घसा आणि थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. थायरॉईडची समस्या असेल तर भुजंगासन करू शकता, कारण हे योग आसन हार्मोन्सच्या स्रावाला संतुलित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते.