ध्यान करण्यासाठी श्रेष्ठ वेळ?

मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्यासाठी तर कुठलेही बंधन नसतात पण श्रेष्ठ परिणामासाठी एक वेळ निश्चित केलेले बरे असते. ध्यानासाठी सर्वात जास्त गरज शांती आणि एकाग्रताची असते. हे दोन्ही जेव्हा मिळतात तेव्हा तो काळ ध्यानासाठी सर्वात उत्तम असतो.

योगीसाठी कुठल्याही वेळेचे बंधन नसते पण नवीन साधकांसाठी (अभ्यासकर्ता) वेळेची मर्यादा असते. निश्चित वेळेवर ध्यानाचा अभ्यास केल्याने फक्त संकल्प शक्तीतच वाढ नाही होत बलकी त्यात यशसुद्धा प्राप्त होतो.

ध्यानासाठी सकाळी, मध्यान्ह, सायंकाळी आणि मध्यरात्री ही वेळ सर्वात उत्तम असते. याला संधिकाल म्हणतात, अर्थात जेव्हा दोन प्रहर मिळतात. जसे प्रात:कालामध्ये रात्री आणि सूर्योदय, मध्यान्हमध्ये सकाळ आणि दुपार मिळते. सर्वात उत्तम काळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त (सूर्योदयाच्या आधीचा काळ) असतो. असे मानण्यात येते की या वेळेस ध्यान केल्याने विशेष लाभ मिळतो. कारण की रात्रीची पूर्ण झोप झाल्याने आमच्या मनातील विकार शांत झालेले असतात. झोपेतून उठल्या बरोबरच ध्यान केल्याने एकाग्रता वाढते.

वेबदुनिया वर वाचा