योगसूत्रची भाष्य परंपरा

ND
योगावर लि‍हिलेला योगसूत्र हा एक उत्तम ग्रंथ आहे. योगाविषयी भाष्य करणारा हा पहिला ग्रंथ मानला जातो. पातंजली ऋषींनी इ. स. 2000 पूर्वी हा ग्रंथ लिहिला. पातंजलींनी या ग्रंथात अनंत काळापासून चाललेल्या ध्यान प्रक्रिया, तपस्या यांचे एकत्रित संकलन केले आहे. हा ग्रंथ सर्व विद्यांचा संग्रह समजले जातो. या ग्रंथाबाबत अनेक भाष्ये आहेत, त्यातील काही प्रमुख भाष्ये अशी...

व्यास भाष्य : व्यास भाष्याची रचना इ.स. 200-400 पूर्वी झाल्याचे समजले जाते. योगसूत्रावर व्यासांनी 'व्यास भाष्य' लिहिले असून ते पहिले प्रामाणिक भाष्य समजले जाते.

तत्त्ववैशारदी : पातंजली योगसुत्राच्या व्यास भाष्यात प्रामाणिक व्याख्याकार म्हणून वाचस्पती मिश्रांचा 'तत्त्ववैशारदी' हा प्रमुख ग्रंथ मानला जातो. वाचस्पती मिश्रांनी योगसुत्रे आणि व्यास भाष्य या दोन्ही ग्रंथांवर भाष्य केले आहे. तत्त्ववैशारदीचा रचना काळ इ. स. 841 नंतर समजला जातो.

ND
योगवार्तिक : योगसुत्रावर महत्वाचे भाष्य विज्ञानभीक्षूचे आहे. त्याचे नाव ‘योगवार्तिक’ आहे.

भोजवृती : भोजाचा राज्याची वेळ विक्रम संवत 1075-1110 मानली जाते. धरेश्वर भोज नावाच्या प्रसिध्द व्यक्तीने योग सूत्रावर 'भोजवृत्ती' नावाचा ग्रंथ लिहिला होता. काही इतिहासकार भोजवृत्तीस 16 व्या शतकातील ग्रंथ मानतात.