Yoga Clothes योगा करण्यासाठी योग्य कपडे निवडणे महत्वाचे
शुक्रवार, 1 जुलै 2022 (15:23 IST)
तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर त्यासोबत तुम्ही योग्य कपडे देखील निवडले पाहिजेत. जर तुम्ही योग दिनचर्या पाळत असाल तर योगा करताना योग्य पोशाख निवडावा.
वारं जाऊ शकेल असे फॅब्रिक निवडा- जरी काही लोकांना सैल कपडे योगासाठी आदर्श वाटत असले तरी, या प्रकारचे कपडे आरामदायक असतीलच असे नाही. खरं तर, आपण खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. अशा कपड्यांमध्ये योगासने करताना काही आसने करणे कठीण असते. श्वास घेण्यायोग्य आणि आरामदायक कपडे खरेदी करावे. तुम्ही कॉटन, बांबू आणि लिनन कापड निवडू शकता.
इलास्टिक टॉप- या प्रकारे कपडे स्ट्रेचिंगमध्ये मदत करतात. योगासाठी आरामदायक आणि माफक कव्हरेज असलेले कपडे निवडा. कॉटन मिक्स असलेला स्ट्रेचेबल टी-शर्टपुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी योग्य ठरतात. स्त्रिया बिल्ट-इन ब्रा सह योग टॉप निवडू शकतात.
योग्य पॅंट निवडा- योगा करण्यासाठी इलास्टिक वेस्ट योग पॅंट निवडा. महिलांसाठी योगा पॅंट फोल्डेबल वेस्टसह येतात, जे खूप आरामदायक असतात. कॅप्री स्टाईल योगा पॅंट देखील पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये लोकप्रिय आहेत.
योग्य रंग निवडा- हलके आणि मातीच्या रंगाशी जुळणारे रंग निवडा.
वेळेनुसार कपडे निवडा- जर आपण सकाळी योगा करत असाल तर लेयरिंगसह टॉप निवडू शकता. कारण सकाळी हलका गारवा असू शकतो. आपण टँक टॉपवर हलके जाकीट
किंवा श्रग घालू शकता. कारण गरम झाल्यावर तुम्ही ते सहज काढू शकता.
असे कपडे घालणे टाळावे- योगासने करताना खूप सैल पँट सरकते आणि व्यायामात अडकू शकते.
ड्रॉस्ट्रिंग पॅंट असल्यास पोटावर झोपताना अस्वस्थ होतं.
लूज नेकलाइन्स किंवा कॉलर असलेले टॉप टाळा, असे टॉप्स तुम्हाला आसन करताना त्रास देऊ शकतात.