पाय दुखत आहे, योगा करा!

ND
अधिकतर स्त्री व पुरुषांमध्ये पाय दुखण्याचा त्रास नेहमीच पाहण्यात येतो. महिलांमध्ये याचे मुख्य कारण जास्त वेळ स्वयंपाकघरात उभे राहून काम करणे, कपडे धुणे, मधुमेह, हाय हिलच्या चपला घालणे, जास्त चालणे. तसेच पुरुषांमध्ये याचे कारण म्हणजे ऑफिसच्या खुर्चीवर पाय लटकवून बसणे, जास्त गाडी चालवणे, जास्त वेळ उभे राहणे, कडक हिलचे जोडे घालणे इत्यादी.

वर दिलेल्या त्रासांपासून सुटकारा मिळवण्यासाठी काही सोपे आसन दिले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पाय दुखण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.

दंडासन : भिंतीला पाठ टेकून टिकवून बसावे. गुडघे व पाय सरळ करावे. योग बेल्टच्या मदतीने पायाचे पंजे आपल्याकडे ओढावे. या आसनाला दहा ते 15 मिनिट करावे, मध्येच थकल्यासारखे वाटत असेल तर पाय ढिले सोडावे. हे आसन केल्याने नक्कीच फायदा होईल.

2. पादाँगुठासन : पलंग किंवा जमिनीवर लेटून दोन्ही पाय सरळ करावे. दोन्ही पाय आपल्याकडे ओढावे. योग बेल्टच्या मदतीने पायाला सरळ वर उचलावे. गुडघे सरळ ठेवून पंजे आपल्याकडे ओढावे. ही क्रिया किमान एक ते तीन मिनिटापर्यंत करवी. आसन करताना श्वास नाही रोखायला पाहिजे.

3. अंग संचलन : दंडासनमध्ये बसून पायांचे अंगठे आणि बोटांना पुढे मागे दाबावे. टाच स्थिर ठेवाव्या. मग संपूर्ण पंज्याला टाचांसमेत पुढे मागे दाबावे. पुढे दाबताना टाचेचे जमिनीवर घर्षण व्हायला पाहिजे. हा अभ्यास सायटिका पेन व गुडघ्यांवर उपयोगी आहे. हा अभ्यास 8-10 वेळा करायला पाहिजे.

सावधगिरी : जर पायांमध्ये कुठल्याही प्रकारचा गंभीर रोग असल्यास तर एखाद्या योग शिक्षकाच्या सल्ल्यानुसार वर दिलेल्या योगा एक्सरसाइज करायला पाहिजे.

फायदे : वर दिलेल्या योगा एक्सरसाइजाला नेमाने केल्याने पायांचे दुखणे दूर होऊन पाय मजबूत आणि स्वस्थ राहतील.

वेबदुनिया वर वाचा