चार वर्षाची मिनी, कधी आईच्या हातांना आपल्या चिमुकल्या हातांमध्ये उचलते, कधी स्वत:च्याच हातावर उभी होते, तर कधी डोक्यावर उभ्या झालेल्या आपल्या आईच्या पायांवर बसते. बघताना ही कसरत वाटेल, मात्र खरं तर हा योगाचा एक भाग आहे. न्यू जर्सीची रहिवाशी असलेली चार वर्षाची ही मिनी आपली आई लौरासोबत योगा करताना हटके पोज देते. तिच्या या पोज बघून बघणारे नक्कीच अचंबित होतात.
मिनीची आई आणि योगा एक्सपर्ट लौरा केसपरजक यांनी सांगितले, ‘माझी चार वर्षाची मुलगी मिनीला माझ्याप्रमाणेच योगात रुची असल्याचे हळूहळू माझ्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही दोघींनी एकत्र योगा करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने माझ्यासारख्या पोज दिल्या. मिनी कॅमेर्यासमोर उत्कृष्ट योगा करते. तिची योगा करतानाची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली असून आतापर्यंत लाखो लोकांनी ती पाहिली आहेत.’