2023 मध्ये गुगलवर सर्वांत जास्त सर्च केली गेलेली रेसिपी कोणती?

शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (13:14 IST)
2023 या वर्षाची लवकरच सांगता होणार आहे. तुम्हाला माहितेय का यावर्षी लोकांनी गुगलवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी शोधल्या (सर्च केल्या) आहेत? तुम्ही अंदाज बांधू शकता का, की सर्वाधिक सर्च केलेली पाककृती कोणती? गुगल सर्च इंजिनच्या 25 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू कोण आहे?
 
गेल्या काही वर्षात लोकांतर्फे कोणत्या शैलीचे चित्रपट सर्वाधिक सर्च केले गेलेत? सर्वात जास्त कोणता खेळ सर्च केला गेला याचा एक व्हिडिओ गुगलने मंगळवारी ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केला.
 
त्यामध्ये विराट कोहली हा सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटपटू आहे.
 
गुगल सर्च इंजिनने यावर्षी 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 वर्षांच्या प्रवासात सर्च इंजिनवर कोणते विषय सर्वाधिक सर्च केले गेले याचा गुगलने एक व्हीडिओ तयार केलाय.
 
क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली, खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, नील आर्मस्ट्राँगचं चंद्रावर पहिलं पाऊल सर्वाधिक सर्च केलं गेलंय, सर्वाधिक सर्च केली गेलेली अॅनिमेशन मालिका पोकेमॉन, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये बॉलीवूड, आईस बकेट चॅलेंज, एलजीबीटीक्यू विवाह, कोविड मृत्यू इत्यादींना या व्हीडिओमध्ये स्थान पटकावलंय.
 
"25 वर्षांपूर्वी या जगाने गोष्टी सर्च करायला सुरूवात केली आणि इतिहास घडला”, असं म्हणत व्हीडिओला सुरूवात होते.
 
ही आहे 2023 मध्ये सर्वाधिक सर्च केलेली पाककृती
गेल्या 25 वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी तसंच 2023 मध्ये कोणत्या विषयांनी नेटिझन्सचं सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं याची यादी देखील गुगलने प्रसिद्ध केलंय.
 
यावर्षी सर्वाधिक सर्च केलेली पाककृती तुम्हाला सांगता येईल का? जगातली कोणतीही अवघड किंवा न ऐकलेली रेसिपी नाहीये ही. आंबा पचडीची तयारी आणि रेसिपी या वर्षी सर्वाधिक सर्च केली गेलीये.
 
2023 मध्ये भारतीयांनी सर्च केलेल्या आणि "इयर इन सर्च - 2023" या नावाने जागतिक स्तरावर ट्रेंड झालेल्या विषयांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
 
"इयर इन सर्च - 2023" च्या यादीत सर्वाधिक सर्च केलेल्या विविध श्रेणींमध्ये बातम्या, मनोरंजन, मीम्स, पर्यटन आणि पाककलेचा समावेश असल्याचं गुगलने जाहीर केलंय.
 
या आकडेवारीनुसार, भारतातील लोकं चांद्रयान-3, कर्नाटक निवडणूक निकाल आणि G20, समान नागरी कायदा (यूसीसी) यांसारख्या मुद्द्यांना विशेष प्राधान्य देत असल्याचं समोर आलंय.
 
टॉप 5 मीम्समध्ये 'सो ब्युटीफुल, सो एलिगंट' या ट्रेंडिंग मीमनेही स्थान पटकावलंय.
 
सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत चित्रपटांमध्ये आदिपुरुष आणि वेब सीरिजमध्ये राणा नायडू यांचा देखील समावेश आहे. चला तर मग, श्रेणीनुसार विषय जाणून घेऊयात.
 
भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या घटना
चांद्रयान मोहीम या वर्षी भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाची घटना होती. त्याखेरीज इतरही अनेक विषयांनी गुगल सर्चच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
चांद्रयान-3
कर्नाटक निवडणूक निकाल
इस्रायल बातम्या
सतीश कौशिक
अर्थसंकल्प 2023
तुर्की भूकंप
अतीक अहमद
मॅथ्यू पेरी
मणिपूर
ओडिसा रेल्वे अपघात
सामान्य ज्ञानाशी संबंधित विचारले गेलेले प्रश्न
जी20 (G20) म्हणजे काय?
यूसीसी (UCC) म्हणजे काय?
चॅट जीपीटी म्हणजे काय?
हमास कोण आहे?
28 सप्टेंबर 2023 बद्दल विशेष काय आहे?
चांद्रयान-3 म्हणजे काय?
इंस्टाग्रामवरील थ्रेड्स हा प्रकार काय आहे?
क्रिकेटमध्ये टाईमआऊट म्हणजे काय असतं?
आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम काय असतो?
सेंगोल म्हणजे काय?
वैयक्तिक आवड
वैयक्तिक आवड किंवा रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल नेटीझन्सने खालील गोष्टी सर्च केल्या आहेत.
 
सूर्यप्रकाशामुळे केस आणि त्वचेला पोहोचणारी हानी घरगुती टिप्स वापरून कशी टाळता येईल?
यूट्यूबवर 5 हजार सबस्क्राइबर्स कसे मिळवायचे?
कबड्डीमध्ये चांगली कामगिरी कशी करता येईल?
कारचं मायलेज कसं वाढवायचं?
बुद्धिबळात ग्रँडमास्टर कसं व्हावं?
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला सरप्राईज कसं करावं?
अस्सल कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखायची?
पॅन कार्ड आधार कार्डासोबत लिंक आहे की नाही हे कसं तपासायचं?
व्हॉट्सअॅप चॅनेल कसं तयार करायचं?
इंस्टाग्रामवर ब्लूटिक कशी मिळवायची?
आमच्या जवळपास काय आहे?
गुगलचं एक फिचर आहे "निअर मी". आसपासच्या गोष्टी शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. लोकांनी ते फिचरही पुरेपूर वापरलं आहे. त्यात त्यांनी खालील गोष्टी शोधल्या.
 
घरबसल्या लोकांनी, आजूबाजूच्या परिसरातील दुकानं, शैक्षणिक संस्था आणि मनोरंजनाची ठिकाणं
घराच्या सर्वात जवळचा कोडिंग क्लास कोणता?
नुकताच झालेला भूकंप
घराजवळचा झुडिओ शॉपिंग मॉल
जवळपास ओणम सध्या खायला मिळू शकते का?
आमच्या घराजवळच्या कोणत्या चित्रपटगृहात जेलर चित्रपट दाखवला जातोय?
जवळचं ब्युटी पार्लर
घराजवळची व्यायामशाळा
घराजवळील रावण दहनाचा कार्यक्रम
घराजवळ असलेले त्वचारोग तज्ज्ञ
घराजवळचं जेवणाचा डबा पुरवणारं केंद्र
क्रीडा स्पर्धा
आयपीएल
क्रिकेट विश्वचषक
एशिया कप
वुमन्स प्रीमियर लीग
आशियाई खेळ
आयएसएल
पाकिस्तान सुपर लीग
ॲशेस मालिका
महिला क्रिकेट विश्वचषक
एसए20
लोकप्रिय क्रिकेट सामने
भारतात सर्वाधिक जे सामने सर्च केले गेले ते भारत विरुद्ध प्रतिस्पर्धी देश होते हे वेगळं सांगायला नको.
 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध आयर्लंड
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
भारत विरुद्ध बांगलादेश
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
चित्रपट
‘आदिपुरुष’ आणि ‘द केरला स्टोरी’ हे सर्वाधिक सर्च केलेले चित्रपट आहेत. त्याखेरीज खालील चित्रपटांचा नंबर लागतो.
 
जवान
गदर 2
ओपनहायमर
आदिपुरुष
पठाण
केरळ कथा
जेलर
लिओ
टायगर 3
इनहेरिटन्स
व्यक्ती
कियारा अडवाणी
शुभमन गिल
रचिन रवींद्र
मोहम्मद शमी
एल्विश यादव
सिद्धार्थ मल्होत्रा
ग्लेन मॅक्सवेल
डेव्हिड बेकहॅम
सूर्यकुमार यादव
ट्रॅव्हिस हेड
वेब सिरीज
फेक
वेनस्डे
असुर
राणा नायडू
द लास्ट ऑफ अस
स्कॅम 2003
बिग बॉस 17
गन्स ॲन्ड रोझेस
सेक्स/लाईफ
द ग्रेव्ह
मीम्स
भूपेंद्र जोगी मीम्स
सो ब्युटीफुल, सो एलिगंट मीम्स
मोए मोए मीम्स
बैगन मीम्स
औकात दिखा दी मीम्स
ओहायो
द बॉय्ज
एल्विश भाई मीम्स
वॅफल हाऊस न्यू होस्ट मीम्स
स्मर्फ कॅट मीम्स
पर्यटन स्थळं
अंदमान हे सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
 
व्हिएतनाम
गोवा
बाली
श्रीलंका
थायलंड
काश्मीर
कुर्ग
अंदमान आणि निकोबार बेटं
इटली
स्वित्झर्लंड
इस्रायल-गाझा युद्ध, मॅथ्यू पेरी, बार्बी चित्रपट, शकीरा, गुगल ट्रान्सलेट हे जागतिक स्तरावर गुगल टूल्सद्वारे सर्वाधिक सर्च केलं गेलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती