फक्त एक वर्ल्ड कप खेळले आणि बनले हीरो

शनिवार, 31 जानेवारी 2015 (16:44 IST)
वर्ल्ड कप जिंकून हीरो तर बरेच क्रिकेटर्स बनले. पण असे फारच कमी क्रिकेटर आहे, ज्यांनी फक्त एक वर्ल्ड कप खेळला आणि त्यात धमाकेदार प्रदर्शन करून क्रिकेट जगात आपली वेगळी ओळख कायम केली. असे पाच खेळाडूंच्या डावावर एक नजर  - 

पीटर कर्स्टन दक्षिण आफ्रिका 
1992वर्ल्ड कपामध्ये 37 वर्षीय कर्स्टनने 66.65च्या सरासरीने 410 धावा काढल्या. यात चार अर्धशतक सामील होते. टूर्नामेंटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा फक्त मार्टिन क्रो (456) आणि जावेद मियादाद (437) यांनी काढल्या होत्या. आफ्रीकी संघाचा हा पहिला वर्ल्ड कप होता. 

नील जॉन्सन झिंबाब्वे
ऑलराउंडर। 1999 वर्ल्ड कपामध्ये 1 शतक व 3 अर्धशतकाच्या साहाय्याने 367 धावा काढल्या. 12 विकेटपण घेतले. तीन वेळा मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आला. 2000मध्ये झिंबाब्वे सोडून दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय कॅरिअर 2000मध्ये संपुष्टात आला.    
 

ज्योफ एलॉट न्यूझीलंड 
या जलद गतीच्या गोलंदाजाने 1999 वर्ल्ड कपात 16.3च्या सरासरीने 20 विकेट घेतले. त्याच्या नावावर न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे. जखमेमुळे 2000मध्ये 29 वर्षाच्या वयात या खेळाडूचा क्रिकेट कॅरिअर संपुष्टात आला.  

गैरी गिलमोर ऑस्ट्रेलिया
1975 वर्ल्ड कपामध्ये ग्रुप मॅच खेळण्याचा मोका नाही मिळाला. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा आणि फायनलमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पाच विकेट घेतले. पण वर्ल्ड कप नंतर फक्त एक वनडे सामना खेळण्याचा मोका मिळाला. पण कसोटी सामना खेळत राहिला.   
 

एंडी बिकेल ऑस्ट्रेलिया
जलद गतीचा गोलंदाजाने 2003 वर्ल्ड कपामध्ये 12.3च्या सरासरीने 16 विकेट घेतले. बेवनसोबत दोन सामन्यात क्रमशः: आठव्या आणि 10व्या विकेटसाठी नाबाद 73 आणि 97 धावांची भागीदारी केली. पण 2004मध्ये ऑस्ट्रेलियाई बोर्डाकडून काँट्रॅक्ट नाही मिळाला. आणि त्याचा कॅरिअर संपुष्टात आला.   

वेबदुनिया वर वाचा