विश्व कप, 1975चा इतिहास

सोमवार, 2 फेब्रुवारी 2015 (17:42 IST)
वर्ष 1975मध्ये पहिला विश्व कप क्रिकेट इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. सात जून ते 21 जुलैरोजी खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला होता. आठ संघांना चार-चारच्या दोन ग्रुपमध्ये ठेवण्यात आले होते. प्रत्येक ग्रुपचे शीर्ष दोन संघांना सरळ सेमी फायनलमध्ये प्रवेश देण्यात आले होते.     
 
त्या वेळेस 60 ओवरचा एक सामना होत होता. आणि खेळाडूंना क्रिकेटचे पारंपरिक पोशाख अर्थात पांढरे कपडे घालावे लागत होते. सर्व मॅच दिवसात होत होते. सामना एकूण 120 ओवरचा होत होता. म्हणून मॅच लवकर सुरू होते होते.   
 
पहिल्या ग्रुपमध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि ईस्ट आफ्रिकांचे संघ होते, तर दुसर्‍या ग्रुपमध्ये - वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका. याच वर्ल्डकपच्या एका सामन्यात भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पूर्ण 60 ओवर फलंदाजी केली आणि फक्त 36 धावा काढल्या. त्यात त्यांनी फक्त एक चौकोर लावला होता. तो सामना इंग्लंडच्या विरुद्ध होता. इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर आधी फलंदाजी करत 60 ओवरमध्ये चार विकेट गमावून 334 धावा काढल्या होत्या. डेनिस एमिसने 137 धावांची पाळी खेळली होती.  
 
पण भारताने 60 ओवरमधये तीन गडी बाद करून 132 धावा काढल्या. गावसकरने 174 चेंडूंचा सामना केला आणि एक चोकोरच्या मदतीने फक्त 36 धावा काढल्या आणि नाबाद राहिले. त्याच सामन्यात 59 चेंडूंचा सामना करत गुंडप्पा विश्वनाथने सर्वाधिक 37 धावा काढल्या होत्या. असे म्हटले जाते की वनडे क्रिकेटचा विरोध करण्यासाठी गावसकरने इतका हळू डावा खेळला होता. या वर्ल्डकपमध्ये भारताचा कर्णधार होता श्रीनिवास वेंकटराघवन. 

वेबदुनिया वर वाचा