क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडने आतापर्यंत चारवेळा वर्ल्ड कपाचे आयोजन केले आहे. इंग्लंड 1979मध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडीजच्या हाती 92 धावांनी पराजित झाला होता. या वर्ल्ड कपात इंग्लंड यजमान देश होता. 1987मध्ये भारत-पाकिस्तानच्या संयुक्त आयोजनात झालेल्या वर्ल्ड कपात त्याला ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी पराभूत केले होते.