आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' का म्हणतात?

मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी', असे म्हणतात.
 
महत्त्व : देवांच्या या निद्राकाळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या आसुरी शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, असे समजले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती