नरेंद्र मोदींची आज महाराष्ट्रात तीन सभा

शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (15:17 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार आहेत. मोदी पाच दिवसांत दररोज तीन अशा 15 सभा घेणार असल्याचे समजते. मोदींची आज (4 ऑक्टोबर) मराठवाड्याती बीड, औरंगाबाद आणि मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत.
 
पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांचे 10 दिवस प्रचारसभेसाठी दिले आहेत. त्यानुसार मोदी पाच दिवस महाराष्ट्रात व पाच दिवस हरियाणात प्रचारसभा घेतील. मोदींची पहिली सभा भाजपचे दिवंगत ज्येष्‍ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्या बीड मतदार संघात होणार आहे. दुपारी दोन वाजता अटलजी मैदानावर मोदींची जाहीर सभा होईल. दुसरी सभा 
औरंगाबाद येथील गरवारे स्टेडिअमवर दुपारी 4 वाजता होणार आहे. तर तिसरी सभा सायंकाळी 6.30 वाजता
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे.
 
उद्या, 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, गोंदिया, नाशिक येथे मोदी जाहीर सभा घेतील.

वेबदुनिया वर वाचा