राष्ट्रवादी 130 तर काँग्रेस 158 जागा लढवणार!

गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (11:51 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढविणार या वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. वादामुळे आघाडीची बिघाडी होण्याचीही शक्यता होती. परंतु राष्ट्रवादीने थोडे नमते घेतले असून जागावाटप सूत्र ठरल्याचे समजते. राष्ट्रवादीला 16 जागा वाढवून देण्यास काँग्रेसने होकार दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 130 तर काँग्रेस 158 जागांवर निवडणूक लढणार आहे. 
 
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते 144 जागांवर अडून बसले होते. मात्र  राष्ट्रवादीने ही तडजोड मान्य केल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच पक्षाच्या बैठकीत दिली. या सूत्राला काँग्रेस श्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.
 
राष्ट्रवादीने 114 जागांसाठी प्रत्यक्षात 288 जागांवरील इच्छुकांना बोलावले. यामुळे काँग्रेसने 120 पेक्षा जास्त जागा देणार नसल्याचे पत्रपरिषद घेऊन सुनावले. त्यातच बुधवारी मुलाखती आटोपल्यावर पवार यांनी पक्षाची बैठक घेऊन 130 जागा मिळत असल्याचे सांगितले. 
 
काँग्रेस संसदीय मंडळात 115पेक्षा जास्त जागा देऊ नयेत, असा सूर निघाला. मात्र 130जागा दिल्यास आघाडी शक्य नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जागावाटपावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले.

वेबदुनिया वर वाचा