कांदीवलीमधील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवलेंवर घणाघाती टीका केली होती. त्यावर रामदास आठवले यांनी बदलापूर येथील सभेत राज यांना प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर रडू आल्याचे आठवलेंनी सांगत त्यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले बदलापूर येथे बोलत होते. राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र पेटवून टाकतील आणि मला ओ विझवावा लागेल, अशा शब्दात आठवले यांनी राज यांच्यावर शरसंधान साधले.
दरम्यान, आरपीआयच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा राखी सावंत हिने देखील राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. राज यांच्या आडनावामुळे त्यांना मान आहे. अन्यथा त्यांना कुत्रेही विचारणार नाहीत, अशी जळजळीत टीका राखीने केली होती. राज यांनी मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावे, असे सल्लाही राखीने दिला आहे.