युती टिकविणची जबाबदारी दोघांची

सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (10:49 IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दरम्यान युती टिकविण्याची जबाबदारी शिवसेना आणि भाजप दोघांचीही आहे. असे भाजप नेते एकानाथ खडसे यांनी म्हटले आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर ठेवलेला 151:119:18 चा शेवटचा प्रस्ताव भाजपने फेटाळला आहे. शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात नवीन काहीच नाही, असे सांगत भाजपने 140:130:18 (पान पाच पाहा) असा उलटा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला आहे.
 
मुंबईत पदाधिकार्‍यांचा मोळावा घेऊन शिवसेनेने दिलेल्या इशार्‍याला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘जागावाटपाच्या प्रस्तावांची चर्चा टीव्हीवरून करणे अयोग्य आहे. प्रत्यक्ष भेटून चर्चा व्हायला हवी. युती टिकविण्याची जबाबदारी दोघांची आहे,’ असे भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. ‘यापूर्वीही आम्ही 119 जागांवरच निवडणूक लढवत आलो आहोत. त्यामुळे या प्रस्तावावर आम्ही समाधानी नाही. मुद्दा आहे तो सतत पराभव होणार्‍या जागांचा. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. अदलाबदलीचा फायदा युतीलाच होणार आहे,’ असेही खडसे म्हणाले.
 
‘युतीमध्ये अंतिम वगैरे काही नसते. शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही यावर चर्चा करू,’ असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा