महाराष्ट्र व हरियाणात पंचरंगी लढती मुळे रंगत

बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:48 IST)
आज मतदान; 19 ऑक्टोबरला निकाल  
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या बुधवारी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुरंगी लढत असून प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपली भूमिका मतदारावर ठसविण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केल्याचे  दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर  या दोन्ही राज्यामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर येण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
 
शिवसेना व भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांनी विधानसभेच्या 288 जागांपैकी बहुसंख्य जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. 1999 सालापासून गेली पंधरा वर्षे राज्यात कारभार करणारी दोन्ही काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत तुटल्यामुळे  कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता फारच धूसर असल्याचे मीडिाने केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले आहे.
 
हरियाणामध्ये गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर होते. या निवडणुकीत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप करीत असून मोदी यांच्या जाहीर सभांमुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. गेल्या तीन आठवडय़ामध्ये मोदी यांनी महाराष्ट्र व हरियाणामध्ये सुमारे पंचवीसपेक्षा जास्त जाहीर सभा घेतल. तंना दोन्ही राजतील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे बळ दुणावले आहे.  
 
महाराष्ट्र भाजपतर्फे प्रामुख्याने मोदी, काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांना लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी पंचरंगी लढत होत असून 288 जागांसाठी सुमारे 4118 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू या मोदी यांच्या आवाहनाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
 
हरिाणामध्ये काँग्रेस, भाजप व माजी मख्य मंत्री चौताला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदल अशा तिरंगी लढती घडत आहेत. 

महाराष्ट्र 
पक्ष उमेदवार
भाजप 280
काँग्रेस 287
राष्ट्रवादी 278
शिवसेना 282
मनसे 219
बसप 260
माकप 19
भाकप 34

प्रमुख उमेदवार

* भाजप : देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे-पालवे.
 

* काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, नाराण राणे, शिवाजीराव मोघे.
 
* राष्ट्रवादी : अजित पवार, आर. आर. पाटील, छगन भुजबळ.
 
* शिवसेना : सुभाष देसाई, सुरेश जैन, दीपक केसरकर.
 
* मनसे : बाळा नांदगावकर. 


* उमेदवार : 4119, पुरुष 3843, महिला 276.
 
* मतदार : एकूण 8 कोटी 35 लाख 38 हजार 114.
 
* पुरुष : 4 कोटी 40 लाख 26 हजार 401.
 
* महिला : 3 कोटी 93 लाख 63 हजार 11. 

वेबदुनिया वर वाचा