राज्यात दरवर्षी ३ हजार ७०० शेतकरी आत्महत्या करतात - नरेंद्र मोदी.
६० महिन्यांत मी देशाला अडचणींतून बाहेर काढेन - नरेंद्र मोदी.
भाजपाचे सरकार आल्यावर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले- नरेंद्र मोदी.
जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख करून द्यायची आहे - नरेंद्र मोदी.
छोट्या, सामान्य जनतेची मोठी कामं करण्यासाठी मला दिल्लीत पाठवले आहे - नरेंद्र मोदी.
मला महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे घेऊन जायचे आहे - नरेंद्र मोदी
मला दिल्लीत बसून महाराष्ट्राची सेवा करायची आहे. पण माझ्यात व तुमच्यात कोणताही अडथळा असेल तर मी पोचू शकणार नाही.त्यामुळे बाजपाला बहुमताने निवडून द्या - नरेंद्र मोदी.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच कुळातले आहेत. ते राष्ट्रवादी नव्हे तर भ्रष्टाचारवादी लोक आहेत - नरेंद्र मोदी.
गोपीनाथ मुंडे माझे छोटे भाऊ होते - नरेंद्र मोदी.
देशाच्या भल्यासाठी प्रथम महाराष्ट्र वाचवावा लागेल - नरेंद्र मोदी.
तुम्ही १५ वर्ष अशा लोकांना निवडून दिलंत ज्यांनी जनतेपेक्षा फक्त स्वत:ची चिंता केली - नरेंद्र मोदी.
घड्याळ आणि हाताने मिळून सगळं राज्य साफ करून टाकलं. तरूण कर्जात बुडाले आहेत - नरेंद्र मोदी.
अनेकांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं, पण लोकांच भलं झालं नाही - नरेंद्र मोदी
महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे - नरेंद्र मोदी.
आदिवासी, गोरगरीब, मागासलेले काय मिळालं? एक अख्खी पिढी उध्वस्त झाली - नरेंद्र मोदी
१५ वर्ष तुम्ही ज्या आघाडी सरकारला निवडून दिलं त्यामुळे तुम्हाला काय मिळालं? - नरेंद्र मोदी
आज मुंडे हयात असते तर मला महराष्ट्रात यायची गरज नसती - नरेंद्र मोदी.
सभास्थळी जमलेला हा विराट जनसागर हा गोपीनाथ मुंडेच्या तपश्चर्येचे फळ आहे - नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात.
आज आपली लढाई तेलमाफिया, वाळूमाफिया, गुंडाशी आहे - पंकजा मुंडे.
मुंडेसाहेब गेल्यानंतर सांत्वन करताना मोदींजींनी माझ्या डोक्यावर ठेवलेल्या हातामुळे माझं दु:ख नाहीसं झालं - पंकजा मुंडे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी बीडची निवड केल्याबद्दल मी मोदीजींचे आभार मानते - पंकजा मुंडे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बीडमध्ये दाखल, पंकजा, प्रीतम मुंडेसाठी मोदींची प्रचारसभा. युतीबद्दल मोदी सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या
बीड जिल्ह्यात रेल्वे आली पाहिजे ही दिवंगत गोपीनाथ मुंडेची इच्छा होती.
ऊस तोड कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे.