केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बजावलेल्या नोटिसीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. परप्रांतीयांचे वक्तव्य घटनाविरोधी नसल्याचे राज यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. परप्रांतीयांबाबत मुंबईतील कांदिवली येथील सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या उमेदवाराने तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली होती.
राज ठाकरे यांनी मुंबईतील एका प्रचारसभेत परप्रांतीयांना लक्ष्य केले होते. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती.
परप्रांतातून येणाऱ्या लोकांना राज्यात पाय ठेवू देणार नाही ही राज यांची भूमिका सामाजिक सलोखा बिघडवत असल्याची तक्रार भाजपचे उमेदवार विनोद तिवारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयोगाने राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती.