निवडणुकीचे वेध: दिल्लीत आघाडीची तर मुंबईत महायुती बैठक

मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (17:40 IST)
आगामी विधासभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. जागा वाटपासंदर्भात आज मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के अँटनी, अहमद पटेल आदी नेते उपस्थित आहेत. त्याप्रमाणे मुंबईतही महायुतीच्या घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मात्र आता दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सद्या जागा वाटपावरुन राज्यातील आघाडीच्या नेत्यांमध्ये शितयुद्ध सुरु आहे. राष्ट्रवादी 144-144 अशा समान जागावाटापासाठी अडून बसली आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादीची ही मागणी फेटाळून लावली आहे.
 
दुसरीकडे, महायुतीच्या घटक पक्षांचीही जागा वाटपासंदर्भात मुंबईत बैठक होणार आहे. महायुतीमध्ये देखील जागावाटपाचा तिढा कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष शिवाय शिवसंग्राम या घटक पक्षांची मुंबईत बैठक होणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा