...तर तीच बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरली असती- उद्धव ठाकरे

सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (16:23 IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठे गेला होता? असा सवाल उद्धव ठाकरे उपस्थित केला. उद्धव ठाकरे तुळजापूर येथील जाहीर सभेत बोलत होते. 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला लुटले हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रात आहे. गुजरातच्य मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत येऊन मुंबईतील उद्योगपतींनी मुंबईत थांबू नये, गुजरातमध्ये चला असे आवाहन करतात. ही देखील महाराष्ट्राची लूट असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा