उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी बोलावली पदाधिकार्‍यांची बैठक

बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (10:47 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व बड्या नेत्यांना येत्या शुक्रवारी  (19 सप्टेंबर) बैठक बोलावली आहे. यात नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्क नेते आदी सर्व स्तरातील नेत्यांना  बैठकीस बोलावण्यात आले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडण्याचे यातून स्पष्ट संकेत दिल्याचे मानण्यात येत आहे. आज सकाळी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेने वेगळे लढू नये असे वक्तव्य केल्याने शिवसेना शुक्रवारी मोठा निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.

भाजप 135 जागांवर ठाम आहे तर शिवसेनेनेही 150 पेक्षा एकही कमी जागा लढविणार नाही असे ठणकावून  सांगितले आहे. त्यातच सोमवारी उद्धव ठाकरेंनी भाजपला 135 जागा देणे केवळ अशक्य आहे. मित्रपक्षाला हे  मान्य असेल तर ठीक अन्यथा इतर पर्याय उपलब्ध आहेत असे म्हटले होते. यानंतर भाजप आक्रमक आहे व  स्वबळाची भाषा करीत आहे.

वेबदुनिया वर वाचा