आता खरे अच्छे दिन

बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (11:43 IST)
‘अच्छे दिन, अच्छे परिणाम आ गये’, अशी प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पोटनिवडणुकांच्या निकालाचे स्वागत केले. या निवडणुकीत सपाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी मतदारांचेही आभार मानले.
 
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 11 जागांसाठी आणि लोकसभेच्या मैनपुरी या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यापैकी विधानसभेच्या 11 पैकी 8 जागा समाजवादीने तर 3 जागा भाजपने जिंकल्या. मैनपुरी ही लोकसभेची जागाही सपाने आपल्याकडे राखली. या निकालांनी भाजपला का तर समाजवादी पक्षाला ‘बूस्टर डोस’च मिळाला आहे. निकालांनंतर सपाचे सर्वेसर्वा मुलायम आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश भलतेच खूश झालेत. अखिलेश यांनी तर निकालांवरून थेट मोदी यांच्यावरच टोलेबाजी केली आहे.
 
राज्यातील जनतेने जातीयवादी शक्तींना नाकारले असून आता खर्‍या अर्थाने अच्छे दिन आले आहेत, असे अखिलेश म्हणाले. समाजवादी पक्षाने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून त्याचीच पोचपावती मिळाली आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. 

वेबदुनिया वर वाचा