दरवर्षी 14 फेब्रुवरीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो. हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी खूप खास असतो. या दिवशी काही जण एकमेकांसमोर मनातील प्रेम व्यक्त करतात.प्रेमी जोडपे या दिवसाची आतुरतेने वाट बघतात आणि या खास दिवसाची आठवण राहावी म्हणून काही तरी खास करू इच्छितात. तसेच काही लोक आपल्या पार्टनरला वेलेंटाइन डे दिवशी भेटवस्तू देतात. पण अनेकदा लोक अशी भेटवस्तूची निवड करतात की जी वस्तू वास्तुशास्त्र सोबत तसेच ज्योतिषशास्त्रात पण शुभ मानली जात नाही अशा भेटवस्तू नात्यांत दुरावा आणतात. म्हणून अश्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या पार्टनरला देउ नका.