आलिंगन हळुवार भावना स्पर्शाने व्यक्त करायच्या,
दुसऱ्याला मिठीत बद्ध करून, न बोलता सांगायच्या,
गच्च असायला हवा, उबदारपणा त्यातला,
संकट कितीही असो,भरवसा लागतो वाटायला,
ज्याला त्याला आलींगन द्यायची रीत नव्हे आपली,
काही खास नातीच जपतात गोडी त्यातली,
एवढं मात्र खरं की जिंकतो माणूस एका आलिंगनाने,
सत्यता असते त्यात,समजतं प्रत्ययाने!