Chocolate Day 2024 चॉकलेटचा इतिहास जाणून घ्या चॉकलेट गोड नाही तर तिखट होते

शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (17:51 IST)
Chocolate Day 2024 : वेलेंटाइन वीक ची सुरवात झाली आहे. तुम्ही पण तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करणार असाल. फेब्रुवारी महीना हा प्रेमाचा महीना मानला जातो. कारण या महिन्यात वेलेंटाइन डे साजरा केला जातो. सर्व कपल्ससाठी हा दिवस खास असतो. खरतर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याच दिवसाची गरज नसते. पण पार्टनरला स्पेशल असल्याची जाणीव करून देण्यासाठी तुम्ही हा दिवस सेलिब्रेट करावा. वेलेंटाइन डे च्या वीक मध्ये 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे असतो. पण तुम्हाला माहित आहे का की चॉकलेट डे ची सुरवात कशी झाली.चला जाणून घेऊ या. 
 
चॉकलेटचा शोध अमेरिकेत लागला- 
चॉकलेटचे मुख्य साहित्य कोको किंवा कोकोचे झाड याचा शोध 2000 वर्ष पूर्व अमेरिकेच्या वर्षा वनमध्ये लागला. या झाडाच्या फळांमध्ये बिया असतात व त्यापासून चॉकलेट बनवले जाते. सर्वात आधी चॉकलेट बनवणारे लोक मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत होते. चॉकलेट खाण्याचा पदार्थ नाही तर पिण्याचा पदार्थ होता. 
 
1528 मध्ये स्‍पेन ने जेव्हा मैक्‍सि‍को ताबा मिळवला. तेव्हा तेथील राजाने भरपूर मात्रा मध्ये कोकोच्या बियांना आणि चॉकलेट बनवण्याच्या यंत्राना आपल्या सोबत स्पेनला घेऊन गेला. स्पेनमध्ये चॉकलेट श्रीमंतांचे पेय बनले. 
 
इटलीचे एक यात्री फ्रेंसि‍स्‍को कारलेटी ने मध्य अमेरिकेच्या इंडि‍यंसला चॉकलेट बनवतांना पाहिले. आणि त्याने इटलीमध्ये चॉकलेटचा प्रचार केला. 1606 ला इटालीमध्ये चॉकलेट प्रसिद्धीस आली . आणि आज चॉकलेट सर्वांना आवडते.
 
चॉकलेटची सुरवात गोड नाही तर तिखट चवीने झाली-
चॉकलेट पहिले खूप तिखट होती. अमेरिकेतील लोक यात अनेक प्रकारचे मसाले मिक्स करून ते सेवन करायचे. ज्यामुळे चॉकलेट तिखट झाले होते. पण याला गोड बनवण्याचे श्रेय युरोपला जाते. त्यांनी यातील तिखट काढून त्यात दूध आणि साखर मिक्स केले. तेव्हा पासून चॉकलेटला खाण्याची वस्तु बनवण्याचे श्रेय युरोपला जाते. आजच्या काळात चॉकलेट सर्वांना खूप आवडते. सर्व खास समारंभात चॉकलेट आदान-प्रदान केले जाते.   

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती