* आपल्याला राहून- राहून कुणाची तरी आठवण येते, फक्त त्या व्यक्तीच्या विचारात दिवस-रात्र सरत आहे, तर समजून घ्या की आपण प्रेमात पडलायं.
* कुठेही गेल्यावर डोळे त्याला शोधताय याचा अर्थ आपल्याला ती व्यक्ती आवडते.
* एखादं रोमँटिक चित्रपट बघताना नायक-नायिका ऐवजी आपण स्वत:ला आणि त्या व्यक्तीची कल्पना करतोय म्हणजे प्रेम झालंय की.
* रोमँटिक गाणी आणि शेर हे म्हणताना किंवा ऐकताना त्या व्यक्तीची आठवण होते याचा अर्थच की आपण प्रेमाची गोष्ट शेअर करू पाहता.
* एखादं व्यक्तीसमोर आल्यावर किंवा त्याला भेटायचे म्हणून आपण आरशात बघतात, कपडे नीट करू लागता किंवा केसांवरून हात फिरवू लागता याचा अर्थ आहे की आपण त्या व्यक्तीला आकर्षित करू इच्छित आहात.
* त्या व्यक्तीची एखादं वस्तू हातात आल्यावर ती वस्तू निरखून पाहत राहणे किंवा त्याकडे आकर्षित होणे म्हणजेच आपण प्रेमाच्या वाटेवर आहात.
* स्वत:बरोबर घडलेली प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला सांगू इच्छित असल्यास ती व्यक्ती आपल्या जवळची आहे हे निश्चित.
* त्या व्यक्तीची निंदा करणे किंवा ऐकणे मुळीचं आवडत नाही अर्थात आपले प्रेम खरे आहे.
* त्या व्यक्तीचा मूड सांभाळण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करता आणि तिला किंवा त्याला दुखी पाहू शकतं नाही म्हणजेच आपण आविष्यभर त्याच्यासोबत राहू इच्छिता.
* प्रत्येक गोष्टींत त्या व्यक्तीला जोडू पाहताय म्हणजे त्याबरोबर पुढील जीवनाची कल्पना मांडताय अर्थातच आपण प्रेमात आहात.