Viral Video नरेंद्र मोदी भर सभेत कार्यकर्त्याच्या पाया पडले
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (09:38 IST)
उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक 2022 सुरु आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहे. भाजपकडून प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी यूपीमधील उन्नावमध्ये पोहोचले. तिथे एका कार्यकर्त्याने पीएम मोदींच्या पायाला हात लावला पण त्यांनतर काय झाले ते बघा-
भाजप नेते आणि हरियाणाचे प्रभारी अरुण यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये कार्यकर्ता जेव्हा पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा पीएम मोदी आधी त्या कार्यकर्त्याला थांबवतात. नंतर स्वतःच त्याच्या पायाला स्पर्श करतात.
अरुण यादव यांनी ट्विट केले की, 'कार्यकर्त्याचे पाय फक्त मोदीच स्पर्श करू शकतात. याचे कारण म्हणजे ज्यांनी श्रीरामाची मूर्ती दिली त्यांच्याकडून स्वत:चे पाया पडू देणे हे त्यांना योग्य वाटले नाही.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार्यकर्त्याने आधी भगवान श्रीरामाची मूर्ती पीएम मोदींना भेट दिली. नंतर त्यांच्या पायाला हात लावू लागला तर हे पाहून पंतप्रधानांनी लगेचच त्यांना थांबवलं आणि स्वतःच त्यांच्या पाया पडू लागले.