इम्रान मसूद यांना यावेळी सहारनपूरमधील बेहटमधून निवडणूक लढवायची होती. पण समाजवादी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही तेव्हापासून ते नाराज होते. त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ज्यात ते म्हणत होते की मुस्लिमांनी आता एकत्र यावे. नंतर ते बसपमध्ये जातील अशा बातम्याही येऊ लागल्या होत्या मात्र चार ते पाच दिवस त्यांच्या समर्थकांशी बोलून लखनौला पोहोचले.
येथे अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि आपलं मन त्याच्यासमोर ठेवलं. बैठक संपल्यानंतर काही वेळातच सपाने इम्रानचे निकटवर्तीय नेते अंजुम रागीब यांना सहारनपूरचे जिल्हाध्यक्ष केले. समाजवादी पक्ष आणि आरएलडी युतीसाठी इम्रान हे तत्परतेने काम करतील, असे ठरले.