उत्तर प्रदेशात निवडणूक पूर्व एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची बंदी

रविवार, 30 जानेवारी 2022 (11:06 IST)
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
 
राज्यामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल सादर करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.

प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमानं या काळात एक्झिट पोल प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई आणि दोन वर्षांपर्यंत शिक्षेचीही तरतूद असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पटेल यांनी निवडणूक आयोगाकडं याबाबत मागणी केली होती. एक्झिट पोलमुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असं म्हणत त्यांनी यावर आक्षेप घेतला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती