पोलीस एन्काउंटर कधी करते,सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (17:01 IST)
चकमक याला एन्काउंटर देखील म्हणतात.20 व्या शतकापासून हा शब्द भारत आणि पाकिस्तानमध्ये अधिक लोकप्रिय झाला.त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी दहशतवादी आणि गुंडांपासून बचाव करण्यासाठी मारायचे. पोलिसांनी त्याचा वापर बनावट चकमकींसाठी केला, असे सांगण्यात आले.

भारतात अद्याप असे कोणतेही कायदे लागू करण्यात आलेले नाही ज्या मध्ये पोलिसाना आरोपीला एन्काउंटर करण्याची सूट आहे. काही परिस्थिती मध्ये पोलिसांना एन्काउंटर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 

पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस स्वसंरक्षणासाठी गोळीबार करू शकतात.पोलिसांना थेट गोळी झाडण्यापूर्वी आरोपीला इशारा देऊन थांबवावे लागते आरोपीने असे न केल्यास पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार आहे. 
 
चकमकीचे प्रकार -
देशात चकमकीचे दोन प्रकार आहे. पहिले ते ज्यात आरोपी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्न करतो. अशा वेळी पोलीस त्याला रोखण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी गोळीबार करतात. 
दुसरे ते ज्या मध्ये पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी जाते आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो.

अशा परिस्थितीत आरोपीला रोखण्यासाठी किंवा त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कारवाई करते. किंवा आरोपीने पोलिसांवर हल्ला केल्यावर देखील पोलीस एन्काउंटर करते. 
 
सर्वोच्च न्यायालय (SC) मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या -
1. जेव्हा पोलिसांना गंभीर गुन्हा केलेल्या व्यक्तीबद्दल कोणतीही गुप्त माहिती किंवा सूचना मिळते, तेव्हा त्याची नोंद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात किंवा केस डायरीमध्ये करावी लागते.
 
2. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एन्काउंटर झाल्यास आणि गुन्हेगाराचा मृत्यू झाल्यास एफआयआर दाखल करावा लागेल. मग तो काही कलमांखाली कोर्टात पाठवावा लागतो.
 
3. चकमकीचा स्वतंत्र तपास पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या (चकमकीत सामील असलेल्या पोलीस दलाच्या प्रमुखाच्या एका स्तरावरील) किंवा CID च्या देखरेखीखाली केला जातो.
 
4. पोलिसांच्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या गुन्हेगारांची संबंधित कलमांतर्गत दंडाधिकाऱ्यांनी चौकशी केली जाईल. त्यांचा अहवालही न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवावा लागणार आहे.
 
5. याशिवाय चकमकीची माहिती राज्य मानवी हक्क आयोग किंवा NHRC ला विनाविलंब द्यावी लागेल.
 
6. एखाद्या चकमकीत गुन्हेगार जखमी झाल्यास त्याला तातडीने उपचार द्यावे लागतील. तसेच, वैद्यकीय अधिकारी किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे बयाण नोंदवावे. यासोबतच फिटनेस प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे.
 
7. घटनेचा तपास पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल न्यायालयात पाठवावा लागेल. चकमकीनंतर दोषी किंवा पीडितेच्या जवळच्या नातेवाईकाला माहिती द्यावी लागेल.
 
केंद्रशासित प्रदेशांसाठी NHRC मार्गदर्शक तत्त्वे-
एनएचआरसीने केंद्रशासित प्रदेशांमधील चकमकींसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. याअंतर्गत कोणत्याही पोलीस ठाण्याच्या प्रभारींना चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यास ती नोंद वहीमध्ये नोंदवावी लागेल. 
 
त्याचबरोबर कोणत्याही पोलीस ठाण्याच्या प्रभारींना चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यास त्याची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागेल. मिळालेली माहिती संशय निर्माण करण्यासाठी पुरेशी मानली पाहिजे आणि त्याशिवाय, परिस्थितीचा तपास करण्यासाठी तत्काळ पावले उचलली पाहिजेत जेणेकरून गुन्हा घडला आहे की नाही आणि कोणी केला आहे हे कळू शकेल. तसेच चकमकीचे गुन्हेगार हे त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस असतील, तर त्याचा तपास सीआयडीसारख्या अन्य एजन्सी कडून करायला हवा.
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती