आता आपल्याला तिकिटासाठी, एजंटच्या फेऱ्यांसाठी जावे लागणार नाही, घरी बसून काही मिनिटांत कन्फर्म तिकिटे बुक करा, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:04 IST)
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC द्वारे, आता आपण  घरी बसून काही मिनिटांत आपली तिकिटे बुक करू शकता. आता आपल्याला  रेल्वेच्या तिकिटासाठी एजंटच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
 
जर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल आणि आपल्याला  तिकिटे बुक करायचे असतील , तरआपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता आपल्याला आपल्या तिकिटासाठी एजन्ट ला भेट देण्याची गरज भासणार नाही. वास्तविक, IRCTC प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC द्वारे, आता आपण घरी बसून काही मिनिटांत आपली तिकिटे बुक करू शकता. आता आपल्याला रेल्वेच्या तिकिटासाठी एजंटच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आपल्याला इच्छित ठिकाणी जाण्यासाठी फक्त IRCTC वर एक खाते तयार करावे लागणार. खाते तयार केल्यानंतर आपले पैसेही वाचतील. आज आम्ही आपल्याला IRCTC वर खाते तयार करून ब्रोकरला अधिक पैसे देण्याचे कसे टाळू शकता ते सांगत आहोत.
 
IRCTC अकाउंट  तयार करण्याची प्रक्रिया
 
* सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.co.in वर जा.
 
* त्यानंतर रजिस्टर पर्यायावर क्लिक करा.
 
* यानंतर एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला आपली मूलभूत माहिती (नाव, ईमेल, मोबाईल नंबर आणि पत्ता इ.) भरावा लागेल.
 
* यानंतर शेवटी कॅप्चा कोड येईल, तो भरा आणि सबमिट करा.
 
* जेव्हा आपण सबमिट वर क्लिक कराल तेव्हा आपल्या समोर टर्म आणि कंडीशनचे एक पेज उघडेल, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागणार.
 
* यानंतर, आपल्याला आपल्या मोबाईलवर अकाउंट तयार करण्याचा मेसेज येईल
 
* IRCTC.co.in/mobile वर आपल्या IRCTC युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करा किंवा IRCTC अॅप डाउनलोड करा.
 
* यानंतर आपल्याला ट्रेन तिकीट पर्यायाखाली प्लेन माय जर्नी वर क्लिक करावे लागेल.
 
* यानंतर, आपल्याला प्रवासाची तारीख आणि ट्रेन निवडावी लागेल आणि बुकिंग कंटिन्यू करा.
 
* यानंतर आपण विद्यमान प्रवासी यादी वापरा आणि प्रवासी जोडा.
 
* यानंतर बुकिंगची पुष्टी करा आणि आपण क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय/पेटीएम द्वारे पेमेंट करू शकता.
 
* आता बुकिंग केल्यानंतर, प्रवाशाला पीएनआर, ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख आणि क्लाससह तिकिटाच्या संपूर्ण तपशीलांसह आरक्षण संदेश मिळेल. प्रवासादरम्यान, त्यांच्या मोबाईलवर कन्फर्म तिकिटाचे आरक्षण संदेश दाखवणे आवश्यक आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती