आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. आता सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर आपण आधार आणि पॅन लिंक केले नसल्यास आपलं कार्ड रद्द होऊ शकतं. याचा अर्थ आपण पॅन कार्ड वापरू शकणार नाही. जर आपण आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर हे काम प्राथमिकतेने करवा. या प्रकारे करू शकता लिकं-
SMS द्वारे आधार आणि पॅन कार्ड करा लिंक
एसएमएसच्या माध्यमाने आपण आपलं आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. यासाठी सर्वात आधी UIDPN टाइप करून स्पेस द्या. नंतर पॅन आणि आधार कार्ड नंबर एंटर करा. ही माहिती 567678 किंवा 56161 नंबरवर पाठवा. आता इन्कम टॅक्स विभाग आपले दोन्ही नंबर लिंक प्रक्रियेसाठी पाठवून देईल.
ऑनलाईन करा आधार आणि पॅन कार्ड
1. सर्वात आधी आधार आणि पॅन कार्डाला लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा.
2. वेबसाइटवर गेल्यानंतर आपल्याला लिंक आधारावर टॅप करावं लागेल.
3. त्यात सर्वात वरती पॅन नंबर टाका. नंतर आधार नंबर, आपलं नावं (आधार कार्डात असलेलं) टाका. आता कँपचा टाकून लिंक आधारावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर आपोआप पडताळ होईल आणि आपला आधार नंबर पॅनने जुळेल.