जेव्हा आपण संपूर्ण महिना काम करतो, तेव्हा आपल्याला पगाराच्या रूपात पैसे मिळतात. आमचा पगार हातात मिळणाऱ्या पैशां पेक्षा आपला पगार जास्त असतो, पण आपल्या पगाराचा काही भाग दरमहा वैद्यकीय विमा, ईएसआय आणि पीएफ सारख्या गोष्टींसाठी कापला जातो. जर आपण पीएफ बद्दल बोललो तर दरमहा जमा केलेले पैसे आपल्या पगारातून आणि आपल्या कंपनीच्या वतीने आपल्या पीएफ खात्यात जमा केले जातात .नंतर ते पैसे आपण आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. आता आपण घरी बसल्या ऑनलाईनद्वारे PF साठी अर्ज करू शकता. आणि पी एफ चे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.या साठी आपल्याला काही सोप्या प्रक्रियेचे अवलंब करावे लागणार.चला तर मग जाणून घेऊया त्या सोप्या प्रक्रियेबद्दल.
ही आहे प्रक्रिया: -
* जर आपला पीएफ कापला जातो, तर सर्वप्रथम आपल्याला आधी https: unifiedportal mem.epfindia.gov.in वेबसाइटवर जावे लागेल. हे पीएफ डिपार्टमेंटचे अधिकृत संकेतस्थळ आहे. जिथे आपल्याला यूएन नंबर आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल.
* आता आपल्याला ऑनलाईन सर्व्हिसवर जावे लागेल आणि क्लेम (फॉर्म 31, 19, 10 सी आणि 10 डी) वर क्लिक करावे लागेल.