कर्मचारी भविष्य निधीच्या (Employee provident fund) सदस्यांमध्ये कोविड-19 साथीच्या काळात 'उमंग' अॅप चा वापर सोयीस्कर होता. कामगार मंत्रालयानुसार ऑगस्ट 2019 नंतर या अॅप वर तब्बल 47.3 कोटी हिट झाले आहेत. या मध्ये 41.6 म्हणजे 88 टक्के हिट केवळ कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सेवेमुळे झाले आहेत.
कामगार मंत्रालयाच्या मते, 'द यूनिफाइड मोबाइल एप्लीकेशन फार न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) ईपीएफ भागधारकांमध्ये हे अॅप खूप पसंत केले गेले आहेत. या अॅपच्या माध्यमातून कोविड -19 साथीच्या काळात त्यांना घरी बसूनच ईपीएफ सेवा मिळण्याची सुविधा मिळाली.
ईपीएस सुविधा काय आहे ?
कर्मचारी निवृत्ती वेतन (पेंशन) योजना, 1995 च्या अंतर्गत आपण योजनेच्या प्रमाणपत्रासाठी आवेदन करू शकता. पेंशन योजना प्रमाणपत्र केवळ त्याच सदस्यांना दिले जाते ज्यांनी आपले ईपीएफ फंड काढून घेतले आहेत, परंतु ते पेंशनच्या लाभासाठी निवृत्तीच्या वयापर्यंत ईपीएफ सह सदस्यता कायम ठेवण्याचे इच्छुक आहेत.
कर्मचारी निवृत्तीवेतन योजना (ईपीएस)1995, अंतर्गत एखादा सदस्य निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र तेव्हाच असतो जेव्हा तो किमान 10 वर्ष तरी याचा सदस्य असतो. अश्या परिस्थितीत जेव्हा सदस्य नवीन नोकरी मिळवतात तेव्हा हे निवृत्ती वेतन योजनेचे प्रमाणपत्र त्याला नवीन नियुक्तीसह पेंशनचे फायदे जारी ठेवण्यासाठी मदत करतं. सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास योजनेचे प्रमाणपत्र कुटुंबातील इतर सदस्यांसाठी उपयुक्त ठरतं.