कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत अडकल्यास कर्मचारी एका तासाच्या आत भविष्य निर्वाह निधीतून (EPF) एक लाख रुपये काढू शकतात. ईपीएफओ सदस्य आवश्यक असल्यास कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्यांच्या पीएफ खात्यातून 1 लाख रुपये काढू शकतात. EPFO ही सुविधा पगारदारांना मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत देत आहे. EPFO ने एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.
या अटींवर सुविधा उपलब्ध आहे
मेडिकल एडवांस क्लेम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करावे. तातडीच्या स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही वैद्यकीय दाव्यासाठी अर्ज भरू शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही फक्त एक लाख रुपयांपर्यंत अॅडव्हान्स काढू शकता. जर तुम्ही व्यवसायाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. हे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे अंतिम बिल आगाऊ रकमेवर समायोजित केले जाते.
आता तुम्हाला दावा (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे ४ अंक भरून पडताळणी करावी लागेल.
आता तुम्हाला Proceed for Online Claim वर क्लिक करावे लागेल.
ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडणे आवश्यक आहे (फॉर्म 31).
त्यानंतर तुमचा पत्ता टाका
त्यानंतर Get Aadhar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका आता क्लेम फाइल होऊन जाईल.