महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला असला तरी यंदा ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्सचे प्रचंड टेंशन आले आहे. परंतु, या निकालात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले तरी काळजी करु नका. कारण बोर्ड तुम्हाला पेपर पुनर्मूल्यांकनाचा (Revaluation) ऑप्शन देते.
बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला असून कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा झाली असल्याने विद्यार्थ्यांना मार्क्सचे टेंशन आले आहे. अथवा कधी-कधी पेपर चांगला सोडवल्यानंतरही अनेकांना कमी मार्क्स पडतात. अशावेळी अनेक विद्यार्थी तणावाखाली येतात. यासाठी निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा.
पेपर्स पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायांकीत प्रत मिळणार आहेत.