देशासह राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सतर्कता बाळगत राज्य सरकारने नागरिकांना पुन्हा एकदा अलर्ट राहण्याचे आवाहन केलं आहे. तर शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी शाळांसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा सुरू ठेवू तसेच शाळांकरिता नवी कोविड नियमावली जारी करू असं वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय.
राज्यात पुणे, मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांमध्येही पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एखदा नव्या शैक्षणिक वर्षांतर्गंत येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात शाळा पुन्हा बंद होणार की शाळा सुरुच राहणार यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा बंद करणे चुकीचे असल्याचे गायकवाड म्हणाल्या आहेत.
राज्यात येत्या १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल, यासह शाळांमध्ये मास्क सक्ती करायची की नाही याचा निर्णय येत्या काही दिवसात जारी करण्यात येईल. दरम्यान कोरोना रुग्णसंख्येचा प्रभाव लक्षात घेता शिक्षण विभाग शाळांकरीता नवी कोविड नियमावली देखील देणार आहे.
तसेच “शाळा सुरु करण्यापूर्वी टास्क फोर्सशी आम्ही चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरच एसओपी जाहीर करु. सध्या सर्व मुलांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. सध्या राज्य आणि केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक नियम वेगळे आहेत. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुनच एसओपी जारी केली जाईल,” असेदेखील वर्षा गायकवाड म्हणाल्या