एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी केला जातो आणि आजच्या काळात एलपीजी गॅस ही प्रत्येक घराची मुख्य गरज आहे. हा गॅस सिलिंडर किती दिवस टिकेल आणि कधी संपेल, याचा अंदाज कुटुंबांची संख्या लक्षात घेऊनच लावता येईल. काही लोकांच्या घरात एलपीजी गॅस सिलिंडर महिनाभर पुरतो तर काही लोकांच्या घरात 20 दिवसात गॅस संपतो. हे संपूर्णपणे गॅसच्या वापरवर अवलंबून असतं.
गॅस टाकी 14.2 किलो एलपीजी गॅसने भरलेली असते, जी एका मानक कुटुंबासाठी 35 ते 40 दिवस टिकते. प्रत्येक वेळी गॅस सिलिंडर उचलून एलपीजी गॅस कधी संपणार आहे याचा अंदाज लावता येत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडर कधी संपणार आहे हे जाणून घेऊ शकता.
गॅस सिलिंडर कधी संपणार हे माहीत नसलं तर कधी-कधी घरात आलेल्या पाहुण्यांसमोर लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते. कधी कधी अशी परिस्थितीही येते की आपण स्वयंपाक करत असतो आणि मध्येच गॅस संपतो. काहीवेळा असे होते की रात्रीची वेळ असते आणि गॅस संपतो, परंतु जर तुम्ही ही युक्ती अवलंबली तर तुम्हाला अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.
सर्वात सोपी युक्ती
गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे शोधून काढावे लागेल, यासाठी एवढे मोठे कापड घ्या की गॅस सिलिंडर झाकून जाईल. कापड ओले करून पिळून घ्या. ते सर्व सिलेंडरवर गुंडाळा आणि काही वेळाने काढून टाका. तुम्हाला दिसेल की रिकामा भाग लवकर सुकून जाईल आणि जिथे गॅस आहे तो हळूहळू वाळेल. येथे तुम्ही खडूने चिन्हांकित करू शकता.
अशी चूक करू नका
बर्याचदा लक्षात आले आहे की गृहणी गॅस संपल्याचा अंदाज त्याच्या ज्योतवरुन लावलतात. परंतु ही पद्धत योग्य नाही. जेव्हा गॅस संपणार असतो तेव्हा आगीचा रंग बदलतो हे खरे आहे. गॅस संपल्यावर बरेच लोक सिलिंडर उलटा वापरतात, परंतु अशा प्रकारे अपघाताची शक्यता वाढते.