या सेवेमुळे यूजर्सला आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान Jio सिम वापरण्याची परवानगी असते. हे इंटरनेशनल पॅक आपल्याला सर्व Jio सेवा याचे लाभ घेण्याची परनवागी देतं. ही सेवा आधीपासून 170 देशांमध्ये उपलब्ध आहे. तथापि ही सर्व्हिस वापरण्यासाठी यूजर्सला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. चला जाणून घ्या त्या स्टेप्सबद्दल-
वेबसाइटसाठी या प्रकारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio रोमिंग सेवा सक्रिय करण्यासाठी आपल्याला साइन-इन पर्यायावर टॅप करावे लागेल आणि OTP प्राप्त करण्यासाठी Jio नंबर लिहावा लागेल. ओटीपी प्राप्त केल्यानंतर आपल्याला साइन इन करावं लागेल आणि सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल. सेटिंग पर्याय स्क्रीनच्या उजवीकडे आहे तेथे manage service section वर क्लिक करावे लागेल.
MyJio अॅपद्वारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio यूजर्स MyJio अॅप्लिकेशन या माध्यमातून सेवा अॅक्टिवेट करु शकतात. सेवा वापरण्यासाठी आपल्याला कंपनी अॅप्लिकेशन उघडून सेवा सक्रिय कराव्या लागतील. विशेष रुपाने MyJio App च्या होम स्क्रीनवर ISD / International रोमिंग पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.