Reliance Jio : पूर्ण वर्षासाठी 11 रुपयांचा प्लान, जाणून घ्या फायदा

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (15:52 IST)
भारतात टेलीकॉम कंपन्या मोबाइल डेटा वापरणार्‍या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान आणत आहे. त्यातून जिओ आपल्या ग्राहकांसाठी काही न काही नवीन योजना सादर करत असतो. आता जिओचा सर्वात स्वस्त प्लान वर्षभरासाठी आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती-
 
जिओचा 11 रु चा प्लान 
जिओ आपल्या ग्राहकांना 11 रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. या योजनेत एकूण 1 जीबी डेटा बेनेफिट मिळेल. विशेष म्हणजे या प्लानची वॅलिडिटी आपल्या वर्तमानच्या बेसिक प्लानच्या वॅलिडिटीसह जुळलेली असते, जे आपण आधीपासून रिजार्च केलेले आहे. अर्थात जर आपण 1 वर्षाच्या वॅलिडिटी असणारा प्लान रिचार्ज केलेला असेल तर 11 रु चा प्लान देखील पूर्ण वर्ष चालेल. परंतू यात आपल्याला केवळ 1 जीबी डेटा मिळेल.
 
21 चा प्लान 
तसेच 21 रुपये चा प्रीपेड प्लान देखील असाच आहे ज्यात एकूण 2 जीबी डेटा मिळतो. या प्लानची वॅलिडिटी देखील आपल्या बेसिक प्लानच्या वॅलिडिटी पर्यंत वैध राहील. जसे की सांगण्यात आले आहे हे दोन्ही डेटा पॅक आहे आणि यात इतर कोणतेही बेनेफिट मिळत नाही. आपल्या टॉकटाइम किंवा एसएमएस बेनेफिट हवे असतील तर आपल्या एक कॉम्बो पॅकची गरज भासेल.
 
जिओ फोन ग्राहकांसाठी बेस्ट प्लान 
जिओ फोन ग्राहकांसाठी बेस्ट प्लान 75 रु चा आहे. 75 रु च्या प्लानची वॅलिडिटी 28 दिवस इतकी आहे. 75 रुपयात 28 दिवसापर्यंत जिओ फोन यूजर्सला फ्री अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिट मिळेल. पूर्वी हे प्लान 49 रुपयात मिळत होतं पण आता हे प्लान महाग झालं आहे. जिओने इंटरकनेक्ट यूजेस चार्ज (आईयूसी) समाप्त केला आहे, ज्याने जिओ फोन वापरणार्‍यांना सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनेफिट मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती