आधारकार्डवरील नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि भाषा या बाबींमध्ये बदल करण्याची गरज भासेल असेल तर आधार केंद्रावर न जाता ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या हे काम करता येईल. परंतू काही महत्त्वाचे बदल जसे कुटुंब प्रमुख किंवा पालक यांची माहिती, बायोमेट्रिक अपडेट, मोबाइल नंबरला आधारशी जोडणं यासाठी आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी केंद्रात जाणं आवश्यक आहे. यासाठी आपण 1947 वर डायल करून आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता किंवा अॅपद्वारे क्रेंद शोधही ऑनलाइन घेता येईल. त्यासाठी राज्य, पिन क्रमांक आणि सर्च बॉक्स असे तीन पर्याय उपलब्ध आहे.
आपल्या सोयीची तारीख आणि वेळ निवडा
बुकिंग अपॉईंटमेंट नंबर मिळेल
हे मिळाल्यावर आपण आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक बदल करू शकता.